ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
मुखेड (जि. नांदेड)- तालुक्यातील हिब्बट येथील रमाकांत हनुमंत कागणे याने आत्महत्या करणार असल्याचा व्हिडिओ व्हायरल करून शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी दिनांक 21 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता उघडकीस आली.
हिब्बट गावातील रमाकांत हणमंतराव कागणे याने भावा- भावातील संपतीच्या वाटणीवरून आत्महत्या केली आहे. मोठा भाऊ गोविंद व वहिनी अनुसया हे त्याच्या हिश्शाला येणारी संपती वाटून देत नसल्याने रमाकांत कागणे याने आत्महत्या केल्याचे सांगितले आहे. हिब्बट शिवारातील शेतात रमाकांत कागणेने गळफास घेण्यापूर्वी मोठा भाऊ गोविंद कागणे आणि वहिनी हे संपत्तीचा वाटा देत नसल्याचे म्हटले आहे. नांदेड, हिब्बट, देगलूरमध्ये संपत्ती असून मला संपत्तीतून बेदखल करत आहेत. उलट आता मी मेल्यानंतर तो दारूच्या आहारी गेला होता, कर्जबाजारी झाला होता असे सांगितले जाईल असेही त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. परंतु माझ्यावर झालेले कर्ज माझी पत्नी फेडेन कारण मला शेती आहे. मी आता तुम्हाला सोडून जात आहे. मला माफ करा असे शेवटी म्हणून त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच व सोशल माध्यमावर व्हायरल झालेला रमाकांत कागणे यांचा व्हिडीओ पाहून मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी गळफास घेतलेला मृतदेह खाली उतरून पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी सदरचा मृतदेह मुखेड येथील सरकारी रुग्णालयात दाखल केला आहे. याप्रकरणी सध्या तरी मुखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻