ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– धुलीवंदनाचा उत्साह सुरू असतानाच गोळी घालून जीव घेण्याचा प्रयत्न झाला असून यात एक जण जखमी झाला आहे. शहर व जिल्ह्यात सर्वत्र धूलिवंदन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडत असतानाच दुपारी साडेतीनच्या सुमारास मालटेकडी परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. यात एकजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिली असून जखमीवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरात विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुपारी तीन वाजेच्या सुमारास माळटेकडी पुलावर फायरिंगची घटना घडली. यात एक युवक जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळावर दाखल झाला होता.
शनिवार दि. १८ मार्च रोजी सर्वत्र धुळवड हा सण साजरा होत असतांना दुपारी ही घटना घडली. पोलीस उप अधीक्षक (इतवारा) डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, विमानतळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ननवरे आणि अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार तेथे जाऊन चौकशी केली.
फायरिंगच्या घटनेत दीपक बिगानीया (वय ३५ ) नावाचा युवक जखमी झाला असून त्याच्यावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. परंतु नेमका गोळीबार कोणी केला याबद्दल मात्र अद्याप माहिती मिळू शकली नाही.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻