ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
ट्रॅव्हल्स पुण्याकडे निघालेली असताना चाकूर- लातूर रोडजवळ घडली घटना
नायगाव– नरसी- नायगावहून पुण्याला ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याचा प्रकार काल रात्री घडला. ही ट्रॅव्हल्स चाकूरजवळ पोहोचली असताना हा प्रकार घडला. हा प्रकार वेळीच ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या लक्षात आल्याने, प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
नरसी- नायगावहून गोदावरी ट्रॅव्हल्सची एमएच २० डीडी ७७०७ क्रमांकाची ट्रॅव्हल्स पुण्याकडे निघाली होती. तेव्हा लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील चापोली गावानजीक या ट्रॅव्हल्सच्या काही भागाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली.
ही ट्रॅव्हल्स चापोली जवळ आली तेव्हा या ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या काही प्रवाशांना काहीतरी जळत असल्याचा वास आला. ही बाब लगेचच ट्रॅव्हल्सच्या चालकाला सांगितली. त्यानंतर सर्वांनी गाडी थांबवून बघितले असता, ट्रॅव्हल्सच्या एका भागात स्पार्किंग होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार लक्षात आला त्याठिकाणाहून ट्रॅव्हल्स पुढे नेऊन लातूररोड नजीक ट्रॅव्हल्स थांबवून पुन्हा सर्व तपासले जात असतानाच गाडीने अधिकच पेट घेतला.
ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर गाडीत असलेले सुमारे २५ ते ३० प्रवासी तात्काळ खाली उतरले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे येथे काहीकाळ एकच गोंधळ उडाला होता. गाडीने पेट घेतल्याचे पाहून इतर वाहनांनी आणि परिसरातील ग्रामस्थ तात्काळ मदतीसाठी धावल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. लातूर जिल्ह्याच्या उदगीर येथील बाबा चौधरी यांची ही ट्रॅव्हल्स असल्याचे सांगण्यात येते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻