Tuesday, September 16, 2025

नांदेडचे विमानतळ उद्यापासून पुन्हा सुरू होणार, सर्व विमानसेवा पूर्ववत राहणार; जिल्हाधिकारी कर्डिले यांची माहिती

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडचे विमानतळ उद्या दिनांक 10 सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. नांदेड विमानतळावरून सुरू असलेल्या सर्व विमानसेवा पूर्ववत राहणार असून यामुळे प्रवासी आनंदले आहेत.

शहरातील श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ शुक्रवार दि. २२ आगस्टपासून काही दिवसांसाठी बंद करण्यात आले होते. मुसळधार पावसामुळे विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवर मोठे खड्डे पडले होते, विमानांची वाहतूक सुरक्षित नसल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने हे विमानतळ बंद करण्यात आले होते. धावपट्टीचे काम पूर्ण झाल्याने श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) स्थगिती आदेश मागे घेतला असून बुधवार दिनांक 10 सप्टेंबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

हे विमानतळ नांदेडसोबतच लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, तसेच आदिलाबाद आणि निजामाबाद येथील प्रवाशांना मोठ्या शहरांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. नांदेडहून पुणे, दिल्ली, हैदराबाद, बंगळूर आणि अहमदाबादसारख्या मोठ्या शहरांसाठी नियमित विमानसेवा उपलब्ध होती. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, धावपट्टीची दुरुस्ती पूर्ण झाल्यावरच विमानसेवा पूर्ववत सुरू होऊ शकणार होती. आधी नुकसानीचा अंदाज घेऊन निधीसाठी प्रस्ताव तयार करण्यात आला, त्यानंतर निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम सुरू झाले. आता हे काम पूर्ण झाल्याने श्री गुरु गोविंदसिंग विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास नागरी उड्डयन महासंचालयाने मंजुरी दिली आहे.

या सेवेमुळे पुन्हा एकदा नांदेड शहर विमानसेवेने देशातील विविध महत्त्वाच्या शहरांना जोडल्या जाणार आहे. प्रवाशांची सोय होणार असल्याने नांदेडमध्ये प्रवासी आनंदित झाले आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!