ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- नांदेडच्या आसना ब्रिजवर झालेल्या अपघातात पिता पुत्र ठार झाले आहेत. रुग्णालयात जाताना मोटारसायकलला झालेल्या या अपघातात आजारी वडील चक्क पुलावरून खाली कोसळले.
आजारी वडिलांना नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी आपल्या दुचाकीवरून घेऊन येत असलेल्या मुलाच्या दुचाकीस आईचर या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत वडील पुलावरून खाली कोसळले तर मुलगा रस्त्यावर पडून ठार झाला.
अर्धापूर तालुक्यातील भोगाव येथे राहणारे गोपीनाथ दाजीबा गाडे (वय ४५) हे दुचाकीवर त्यांचे वडील दाजीबा शंकरराव गाडे (वय ६६ वर्षे) यांना नांदेडच्या रुग्णालयात उपचारासाठी निघाले होते. दुचाकी क्रमांक (एम एच २२- एजी- ७८२२) वरून सकाळी घरून निघाले. सहाच्या सुमारास त्यांची दुचाकी आसना बायपास सांगवी पुलावर आल्यानंतर समोरून जाणाऱ्या आईचर टेम्पो क्रमांक (एमएच ४५-एई- ८८११) ने दुचाकीस जबर धडक दिली.
या धडकेत दाजीबा गाडे हे पुलावरून पन्नास फूट खाली फेकल्या गेले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. तर गोपीनाथ गाडे हे रस्त्याच्या कडेला पडून त्यांच्याही डोक्याला जबर दुखापत झाल्याने मृत्यूमुखी पडले. ही माहिती महामार्ग पोलिसांना समजताच पोलीस उपनिरीक्षक आदित्य लाकूळे व त्यांचे सहकारी राजकुमार व्यवहारे, धाडवे यांनी महामार्गाच्या ॲम्बुलन्ससह घटनास्थळी धाव घेतली. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर काहीकाळ वाहतूक खोळंबली होती.
पोलिसांनी रुग्णवाहिकेत दोघांचाही मृतदेह शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथे दाखल केला. तेथील डॉक्टर आणि तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत जाहीर केले. या घटनेमुळे भोगाव गावावर शोककळा पसरली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻