ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड (प्रल्हाद कांबळे)- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या बचत भवनमधील गुंठेवारी विभागाला आज गुरुवार दिनांक 15 डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत हजारो फाईल जळून खाक झाल्या आहेत. आग लागली की लावली याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
नांदेड महानगरपालिका अंतर्गत गुंठेवारीचे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलेले असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामीण भागातील गुंठेवारीच्या कार्यालयाला आग लागल्याने जिल्ह्यात तर्क वितर्क व्यक्त केल्या जात आहे. मागील काही दिवसांपासून गुंठेवारी बंद असल्याने अनेक फायली प्रलंबित होत्या. त्यामुळे मालमत्तांची, शेती, प्लॉटची खरेदी- विक्री ठप्प पडली आहे. वेळीच फायली निकाली निघाल्या असत्या तर ही मोठी हानी टळली असती. विशेष म्हणजे या आगीसोबतच कार्यालयातील संगणक कक्ष व आदी साहित्यही जळून खाक झाले. ही माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन दल अधिकारी रईस पाशा हे आपल्या वाहनांसह व सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. अन्यथा कार्यालयातील एसी व अन्य साहित्यही जळून खाक झाले असते.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्याचे आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. वजिराबाद पोलिसांनी ही घटनास्थळी भेट दिली असून या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻