ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
• मुखेडमध्ये बालाजी पाटील खतगावकर यांच्या प्रयत्नांना धक्का
• भाजपने जाहीर केलेल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी 👇🏼
नांदेड– विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी आज रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलेल्या 99 उमेदवारांमध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांसह चार जणांना संधी देण्यात आली आहे. यात भोकरमधून श्रीजया अशोक चव्हाण, नायगावमधून आमदार राजेश पवार, मुखेड आमदार डॉ. तुषार राठोड आणि किनवटमधून आमदार भीमराव केराम यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ विधानसभेचे मतदारसंघ आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपने चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांच्या समवेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षाचे उमेदवार अजून जाहीर व्हायचे आहेत.
भाजपने पुन्हा एकदा आपल्या अगोदरच्या तीनही आमदारांना संधी दिली आहे. यात डॉ. तुषार राठोड यांना तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भोकर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपली कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, त्यानुसार त्यांना उमेदवारी मिळाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून 2019 च्या विधानसभेमध्ये नायगावमधून राजेश पवार हे विजयी झाले होते. तर तिकडे भीमराव केराम यांनीही कमळ या निशाणीवर विजय प्राप्त केला होता. पुन्हा या तिघांना भाजपने उमेदवारी बहाल केली आहे.
बालाजी पाटील खतगावकर यांच्या प्रयत्नांना धक्का
मुखेडमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. डॉ. तुषार राठोड यांच्या उमेदवारीमुळे त्यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यामध्ये अन्य पक्षांची उमेदवारी लवकरच जाहीर होतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻