ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आज 484 नवे रुग्ण तर 554 रुग्ण झाले बरे
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पण आज सोमवारी याबाबत काहीशी दिलासादायक बातमी आली असून सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकुण 484 नवे रुग्ण आढळून आले असून 554 रुग्ण बरे झाले आहेत.
आज एकूण 1547 टेस्टिंग पैकी 484 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 301 आहे. आज 554 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 547 अहवालापैकी 484 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 445 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 98 हजार 969 एवढी झाली असून यातील 92 हजार 62 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 258 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे लोहा तालुक्यातील धानोरा येथील 46 वर्षाच्या पुरुषाचा रविवार 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 659 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 279, धर्माबाद 3, लोहा 25, हिमायतनगर 2, परभणी 22, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 40, कंधार 3, मुदखेड 9, अर्धापूर 14, आदिलाबाद 1, यवतमाळ 1, भोकर 5, हदगाव 4, मुखेड 15, बिलोली 1, बीड 1, औरंगाबाद 3, देगलूर 5, किनवट 3, उमरी 2, नायगाव 3, उमरखेड 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, बिलोली 2, हदगाव 3, मुखेड 12 असे एकुण 484कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 469, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 75, खाजगी रुग्णालय 3, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 554 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 33, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 982, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 205, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 30 एकुण 4 हजार 258 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 33 हजार 605
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 19 हजार 655
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 98 हजार 979
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 92 हजार 62
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 659
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.90 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-60
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 258
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻