ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना आज शुक्रवारीही रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाली असून आजही आकडा 700 पार गेला आहे. आज एकुण 719 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आज एकूण 1960 टेस्टिंग पैकी 719 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 352 आहे. आज 481 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज 1 रुग्णाचा मृत्यू झालेला आहे.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 960 अहवालापैकी 719 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 592 तर अँटिजेन तपासणीद्वारे 127 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 96 हजार 852 एवढी झाली असून यातील 90 हजार 382 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 3 हजार 812 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे सिडको नांदेड येथील 73 वर्षे वयाच्या महिलेचा 20 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 658 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 335, नांदेड ग्रामीण 39, भोकर 2, देगलूर 3, धर्माबाद 1, कंधार 2, हदगाव 3, किनवट 72, लोहा 3, मुदखेड 1, मुखेड 19, नायगाव 1, हिमायतनगर 3, बिलोली 5, उमरी 40, अर्धापूर 5, माहूर 3, हिंगोली 5, परभणी 29, अकोला 1, हैदराबाद 1, निझामाबाद 1, औरंगाबाद 3, लातूर 1, जालना 1, नागपूर 1, वाशीम 6, यवतमाळ 2, पुसद 1, उमरखेड 2, अहमदनगर 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 4, बिलोली 16, धर्माबाद 17, हदगाव 6, लोहा 3, देगलूर 28, मुखेड 3, नायगाव 6, उमरी 5, भोकर 2, कंधार 13, मुदखेड 7 असे एकुण 719 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 398, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 67, खाजगी रुग्णालय 4, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3 असे एकुण 481 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 709, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 48, हदगाव कोविड रुग्णालय 1, खाजगी रुग्णालय 22, बिलोली कोविड रुग्णालय 2 असे एकुण 3 हजार 812 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती:
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 27 हजार 788
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 16 हजार 287
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 96 हजार 852
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 90 हजार 382
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 658
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.31 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-31
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-77
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-3 हजार 812
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-03.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻