ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
● शहरात दोन आगीच्या घटना; कोणतीही जीवितहानी नाही
नांदेड– शहरातील मिल गेट परिसरात एका उभ्या कारने घेतला पेट घेतल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. तत्पूर्वी पहाटेच्याच सुमारास शहराच्या बिलाल नगर भागात एका फर्निचरच्या दुकानाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
शनिवारी पहाटे साडेतीन वाजता बिलाल नगर येथे मोहम्मद शोएब यांच्या शोएब फर्निचरच्या कारखान्यात आग लागली. ही घटना कळताच अग्निशमन दल अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहचले. आग मोठ्या प्रमाणात लागली होती व ती आजुबाजूच्या परिसरात पसरत होती. शोएब फर्निचरच्या कारखान्याला लागुनच अन्य दुसरे फर्निचरचे कारखाने होते, त्यामुळेही आग आणखी वेगाने पसरण्याची भीती होती. अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवत आग आजुबाजुला पसरु दिली नाही.
आगीची दुसरी घटना
बिलालनगरमधील फर्निचरच्या कारखान्याला लागलेली आग विझवत असताना, सव्वाचार वाजता मिल गेट रोड सोमेश कॉलनीजवळ मोहम्मद यासेर यांच्या MH-43-AB- 7700 Toyota fortuner या गाडीला आग लागली. अग्निशमन दल अग्निशमन वाहनासह तात्काळ घटनास्थळी पोहचले. कारला लागलेली आग अग्निशमन दलाने तात्काळ आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻