Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी केले भीक द्या आंदोलन; आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड आगार व विभागीय कार्यशाळा (वर्कशॉप) येथील दुखवटा लढा विलीनीकरणामधील कर्मचाऱ्यांनी दि. २६ जानेवारी (बुधवार) रोजी एसटी वर्कशॉप ते मध्यवर्ती बसस्थानक दरम्यान पायी चालत रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला असलेल्या बाजारपेठ मधील दुकानात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भीक द्या आंदोलन केले. त्यानंतर आता या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगार संघटनेचे नंदू पाटील बेंद्रीकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये गुणवंत मिसलवाड, रामदास पेंडकर, एम. डी. गौस, बालाजी शिंदे, वामन मोरताटे, गोविंद हाळे, अभिषेक ताकझुरे, चंद्रकांत पांचाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आतापर्यंत ८० कर्मचाऱ्यांनी आर्थिक विवंचनेतून, मानसिक ताण-तणावातून राज्यभरात आत्महत्या केल्या आहेत. तरीही एसटी प्रशासन व महाराष्ट्र शासन दखल घेत नसल्यामुळे तीन महिन्यांपासून विलीनीकरणासाठी दुखवटा लढा पाळत असलेल्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी वैतागून भीक द्या आंदोलन केले. या भीक द्या आंदोलनातून तीन हजार ५८३ रुपये एवढी जमलेली रक्कम जिल्हाधिकारी, नांदेड यांच्यामार्फत राज्याच्या सहाय्यता निधीला पाठवून निषेध व्यक्त करण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमची मागणी लवकर मान्य करावी अशी मागणी भीक द्या आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

या आंदोलनात शिवाजी रामगीरवार, शरद वानखेडे, साधना उकळे, आम्रपाली कांबळे, लता रेड्डी, गणेश कळसे, भगवान दुधारे, सखाराम खांदाजे, संतोष स्वामी, भरत ठाकूर, रमेश बोनलावार, भीमराव चावरे, रावसाहेब पुयड, नंदीअप्पा मठपती, संजय गायकवाड, पांडूरंग नरवाडे, विजय सुर्यतळे, विश्वनाथ भदरगे, मिलींद दवणे, शंकर हंबर्डे, मिलींद सावळे, ज्ञानेश्वर पांचाळ, नागेश अमिलकंठदार, नामदेव गोवंदे, रमेश पाटील, गोविंद मोरे, अच्युत पवळे, जगदीश पवार, नंदकिशोर गटलेवार, रमेश पाटील इत्यादी कर्मचारी सहभागी होते.

यांच्यावर झाले गुन्हे दाखल

दरम्यान, जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकावत व कोरोनासारख्या गंभीर आजाराची लागण होण्याची शक्यता असल्याने भीक द्या आंदोलन करून विनापरवाना बेकायदेशीरत्या, गैर कायद्याची मंडळी जमवून मास्क न लावता, सुरक्षित अंतर न ठेवता जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलनकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस अमलदार रितेश टाक यांच्या फिर्यादीवरून गुणवंत मिसलवाड, नंदू पाटील बेंद्रिकर, अनिकेत पाटील, बालाजी शिंदे, रमेश कदम, जीवन कांबळे, एम. डी. गौस, रमाकांत जाधव, पेठकर, यादव, गोरे व इतर सात जणांविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुंडे करत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!