Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये ओमायक्रोनचा शिरकाव; दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण निघाले पॉझिटिव्ह

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तीनपैकी दोघांचा अहवाल ओमायक्रोन पॉझिटिव्ह

नांदेड– हिमायतनगर तालुक्यातील दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तीन प्रवाशांचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल जीनोवा सिक्वेन्सीगसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. या तीन रुग्णांपैकी दोन रुग्णांचा अहवाल ओमायक्रोन पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

मागील पंधरवड्यात विविध देशातून आलेल्या 302 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यातील तीन जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. या तिन्ही रुग्णांचा जिवोनिक स्केक्वेंन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत अहवाल पाठविण्यात आला होता. एकंदरीत या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचीही तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या तीन जणांचा अहवाल पॉझिटिव आल्याने त्यांना सध्या हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. हे तिन्ही रुग्ण हिमायतनगर तालुक्यातील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. या तीनपैकी दोघांचा सिक्वेन्सिंग अहवाल ओमायक्रोन पॉझिटिव्ह आल्याने नांदेड जिल्ह्यातही ओमायक्रोनचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळावेत, लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!