Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये कोरोना रुग्णवाढी बरोबरच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले; आज 420 नवे तर 201 झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होणे सुरूच असले तरी, त्यासोबतच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. आज सोमवारी 420 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 201 रुग्ण बरे झाले आहेत.

आज एकूण 1253 टेस्टिंग पैकी 420 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 296 आहे. आज 201 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एका ही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 253 अहवालापैकी 420 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 385 तर अँटिजेन तपासणीद्वारे 35 अहवाल बाधित आले आहेत.  जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 94 हजार 205 एवढी झाली असून यातील 88 हजार 584 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 2 हजार 966  रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत नागरिकांनी व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 276, नांदेड ग्रामीण 41, भोकर 2, देगलूर 4, धर्माबाद 6, हिमायतनगर 1, कंधार 2, किनवट 22, लोहा 2, मुदखेड 2, मुखेड 5, नायगाव 1, उमरी 2, बिलोली 2, अर्धापूर 3, परभणी 2, उदगीर 4, हैदराबाद 1, यवतमाळ 1, वर्धा 1, जयपूर 1, हिंगोली 3, मुंबई 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 20, नांदेड ग्रामीण 2, देगलूर 6, धर्माबाद 7 असे एकूण 420 बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 164, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 3, खाजगी रुग्णालय 6, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 26 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 2 हजार 966 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 29, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 7, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 601, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 309,  खाजगी रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 1, बिलोली कोविड रुग्णालय 2 अशा एकुण 2 हजार 966 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 
19 हजार 817
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 
11 हजार 273
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 94 हजार 205
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 584
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.3 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-22
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-111
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-2 हजार 966
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!