ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहराच्या भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थनगर येथे किरकोळ कारणावरून एका मित्राने दुसऱ्या मित्रावर फायरिंग केली. यात साहेबराव जोगदंड हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दि. १ जून रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॅनाल रोडवर असलेल्या सिद्धार्थनगरमध्ये शुभम पारदे उर्फ बाहुबली आणि साहेबराव मनोहर जोगदंड या दोघांमध्ये कुठल्यातरी जुन्या वादातून भांडणे झाली. यातच शुभम पारदे याने आपल्या जवळील पिस्तूलने साहेबराव जोगदंड याच्या पोटात गोळी झाडली. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी जोगदंडला नातेवाईकांनी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर शुभम पारदे हा पसार झाला.
या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) सुरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या दोघांमध्ये नेमका वाद कशावरून झाला याचा शोध आता भाग्यनगर पोलीस घेत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻