ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या युतीमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडणुकीत पुढे आला. त्यावेळी युती असल्याने शिवसेनेलाही चांगल्या जागा मिळाल्या. शिवसेना-भाजपाचे पूर्ण बहुमत आले. मात्र शिवसेनेने या बहुमताचा अनादर करत भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. एवढेच नाही तर कपटाने सत्ता मिळविली असा टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे केली.
नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी राज्यमंत्री कै. गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या “प्रेरणास्थळ” या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवार व रविवार दोन दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर आले आहेत. आज रविवार दि. तीन एप्रिल रोजी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे शहर महानगराध्यक्ष प्रवीण साले, वैद्यकीय आघाडीचे डॉ. अजित गोपछडे, चैतन्यबापू देशमुख यांच्यासह भाजपाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार चिखलीकर यांचे वसंतनगरस्थीत निवासस्थान सोडताना ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना-भाजप युतीला मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी चांगला कौल दिला. त्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. शिवसेनेलाही चांगले यश मिळाले. मात्र शिवसेनेकडून बहुमताचा अनादर केला गेला एवढेच नाही तर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी तीन पक्षांची आघाडी केले आणि कपटाने सत्ता मिळविली असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻