Friday, November 22, 2024

नांदेडमध्ये पंजाब काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करुन भाजपने केला निषेध

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– पंजाबमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडवण्याचा प्रकार झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये पंजाब काँग्रेसच्या पुतळ्याचे दहन करुन भाजप महानगरतर्फे निषेध करण्यात आला.

महात्मा फुले पुतळ्यासमोर झालेल्या या  आंदोलनात भाजप महानगर अध्यक्ष प्रविण साले यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने  घोषणाबाजी करून आयटीआय परिसर दणाणून सोडला. पंजाब काँग्रेस हाय हाय… मुख्यमंत्री चन्नी मुर्दाबाद… पंजाब काँग्रेसच करायचं काय? खाली मुंडकं वर पाय… भारत माता की जय… नरेंद्र मोदी तुम आगे… बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा दिल्या.

आंदोलनाचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना प्रवीण साले म्हणाले की, पंजाबमध्ये झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय असून देशाच्या पंतप्रधानाच्या सुरक्षितेमध्ये हयगय करणाऱ्या पंजाब सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली पाहिजे. यावेळी व्यंकट मोकले, अशोक पाटील धनेगावकर, अनिलसिंह हजारी, सुशीलकुमार चव्हाण, प्रभू कपाटे, अकबरखान पठाण, अभिषेक सौदे यांनी आपल्या भाषणातून झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.

पोलिसांना चकमा देत कुणाल गजभारे यांनी पंजाब काँग्रेसचा पुतळा आणला. पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये  झटापट झाल्यानंतर पुतळा जाळण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना यश मिळाले. पुतळा जळत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात भाजपचे संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, केदार नांदेडकर, कुणाल गजभारे, साहेबराव गायकवाड, आशिष नेरळकर, मारुती वाघ ,संतोष शिरसागर, शंकर मानाळकर, राज यादव, अक्षय अमिल्कंठवार , बाबुराव कासारखेडकर, संदीप पावडे, सुनील पाटील, गौरव कुंटूरकर, श्रीराज चक्रावार, रामराव पाष्टे, परीक्षित भांगे ,महादेवी मठपती ,कांचन ठाकूर, शिवरानी हंगरगे, चक्रधर कोकाटे, आनंद पावडे, अंकुश पार्डीकर, हुकुमसिंग ठाकूर अनेक यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!