Thursday, November 21, 2024

नांदेडमध्ये पुन्हा दोन महिलांना काही महिलांनीच घातला ऑनलाईन गंडा; साडेचार लाख रुपये लुबाडले, भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– मागच्या आठवड्यामध्ये एका अभियंता महिलेला दामदुपटीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घातल्याचा तपास सुरू असतानाच पुन्हा दोन महिलांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला आहे. दोन महिलांना चार लाख 69 हजार 800 रुपयांचा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी भाग्यनगर ठाण्यात काही महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराच्या अष्टविनायकनगर झेंडा चौक परिसरात राहणाऱ्या प्रगती धनराज मस्के (वय 28) व त्यांची मैत्रीण प्रणाली बोकडे यांची ऑनलाइनद्वारे ओळख करून आरोपींनी त्यांना विश्वासात घेतले. 20 एप्रिल रोजी रात्री पावणेदहा ते 21 एप्रिल दुपारी दोनच्या दरम्यान अष्टविनायकनगर येथे प्रगती मस्के यांच्या मोबाईलवर सात आरोपीतांनी हॉटेल रेटिंग्ज द्यावयाचे आहे. हॉटेलवर रेटिंग्ज दिल्यानंतर रेटिंग्ज देणाऱ्यांना कमिशन देण्यात येईल असे आमिष दाखवून त्यांना कमाईचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पाच हजार, ३८ हजार ८००, ८० हजार, ५८ हजार, ९० हजार, परत ९० हजार, १३ हजार व मैत्रीण मृणाली बोकडे यांच्या बँक खात्यामधून ५५ हजार, ४० हजार असा चार लाख ६९ हजार ८०० रुपये भरण्याचा टास्क दिला. हा टास्कचा प्रकार पूर्ण केल्यानंतर पैसे परत करण्याबाबत टाळाटाळीचे बोलणे सुरू केले. आणि नंतर तुमचे पैसे परतफेड होणार नाही असे सांगून गुंतवलेली रक्कम व कमिशन परत न करता त्यांची ऑनलाइन फसवणूक केली.

ही बाब लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रगती धनराज मस्के यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात आरोपी हरीशकुमार, रोशन, नेहा अफ्रीन, ज्योत्स्ना, दिनेश जनरल स्टोअर्स, शालिनी आणि विष्णूकुमार यांच्याविरुद्ध कलम 420, 34 भादविसह कलम 66 (ड) आयटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे यांच्याकडे देण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!