ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– बंडखोर आमदार, खासदारांच्या विरोधात आंदोलन करणारे शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार आणि जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांना नांदेड पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे. दि. १३ ते १८ ऑगस्टपर्यंत नांदेड शहरासह जिल्ह्यात वास्तव्य करण्यास प्रतिबंध का करण्यात येऊ नये असा सवाल पोलिसांनी त्यांना नोटीसद्वारे केला आहे.
शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटात गेलेले नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते. त्यावेळी गुवाहाटीमध्ये असलेले आमदार बालाजी कल्याणकर यांच्या घरावर शिवसैनिकांनी तिरडी मोर्चा काढला. त्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, प्रकाश मारावार यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना अटक करून सुटका करण्यात आली. परंतु दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा त्यांना तडीपारीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
मात्र नोटिसांना व गुन्हे दाखल होण्याच्या या प्रकाराला शिवसैनिक कदापी घाबरणार नाही. यापुढेही शिवसैनिकांचे बंडखोराविरोधात आंदोलन सुरूच राहतील अशी प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻