ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ महागाईविरोधात शिवसेनेचे शहर व जिल्ह्यात आंदोलन
नांदेड- केंद्र सरकारकडून वाढविण्यात आलेल्या डिझेल, पेट्रोल आणि गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात शनिवारी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी तरोडानाका, जुना मोंढा आणि सिडको भागात केंद्र सरकारचा निषेध करून थाळी व हलगी वाजवून आंदोलन केले.
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या महागाईचा उच्चांक झाला असून यात गोरगरीब चांगलाच भरडल्या जात आहे. गॅस सिलेंडर, डिझेल आणि पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने गृहणीसह सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले आहे. केंद्र सरकारने महागाई कमी करावी यासाठी राज्यभर शिवसेनेच्या वतीने आंदोलने करण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहर व जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन केले.
शहराच्या तरोडानाका भागातील शेतकरी पुतळ्यासमोर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जयवंत कदम यांच्या वतीने थाळी आणि हलगी वाजवून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, दयाल गिरी, शहरप्रमुख सचिन किसवे, राजू मोरे, साई विभुते, नवनाथ काकडे, संतोष भारसावडे, पुरभाजी जाधव, राम काहळेकर, गजानन सूर्यवंशी, श्रीकांत कदम, लक्ष्मण कल्याणकर, गजानन धुमाळ, भुजंग जनकवाडे, संदेश जनकवाडे, राम चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
त्यानंतर जुना मोंढा येथे शिवसेनेचे शहरप्रमुख तुलजेश यादव आणि तालुकाप्रमुख उद्धव शिंदे यांनी सिलेंडर दाखवून केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंढारकर, प्रकाश मारावार, सुरेश लोट, बिल्लू यादव, गुरमीतसिंग तमन्ना, प्रकाश जोंधळे, शैलेश रावत, अर्जुन ठाकूर, अमतजितसिंग कालरा, नितीन सरोदे, बालचंद यादव, बालाजी सपुरे यांची उपस्थिती होती. तसेच सिडको भागातही शिवसेनेच्या वतीने चुलीवर भाकरी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना सिलेंडर घेणे परवडत नसल्याने महागाई कमी करावी यासाठी जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻