ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

मुंबई/ नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडसह मुंबई, पुणे तसेच राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेमुळे आता २९ पालिका हद्दीत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्याने राजकीय पक्षातील नेत्यांची धाकधूक वाढली आहे.
मुदत संपलेल्या २७ आणि २ नव्या महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा आज आयोगाकडून करण्यात आली. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईनच घेतले जातील, असे आयोगाकडून सांगण्यात आले. उमेदवाराला ६ महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक करण्यात आले आहे. आयोगाकडून मुंबईसह राज्यातील महापालिकेच्या तयारी संदर्भात माहिती देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांनी सांगितलं की, ‘उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र ऑफलाइन घेण्यात येईल. यासाठी राजकीय पक्षांची बैठक झाली होती. त्यात मागणी केली होती. जातवैधता पडताळणीसाठी राखीव गटाच्या उमेदवारांना जात वैधता आणि जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी सादर अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा दिला तरी स्वीकारला जाईल. सहा महिन्याच्या आत सादर करण्याचे हमीपत्र आणि सादर न केल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल’.
महापालिका निवडणुक कार्यक्रम :
- अर्ज भरण्याची तारीख – २३ ते ३० डिसेंबर २०२५
- अर्जांची छानणी – ३१ डिसेंबर २०२५
- अर्ज मागे घेण्याची मुदत – २ जानेवारी २०२६
- अंतिम उमेदवार यादी – ३ जानेवारी २०२६
- मतदानाची तारीख – १५ जानेवारी २०२६
- निवडणुकीचा निकाल – १६ जानेवारी २०२६
नांदेडमध्ये २० प्रभाग, ८१ सदस्य
नांदेड महापालिकेत एकूण प्रभागांची संख्या वीस आहे. तर सदस्य ८१ निवडून द्यावयाचे आहेत. २० पैकी १९ प्रभागांतून प्रत्येकी चार तर एका प्रभागातून पाच सदस्य निवडून येणार आहेत.
नांदेडमधील आरक्षित प्रभागांची संख्या 👇🏻

याठिकाणी होणार निवडणूक :
- अहिल्यानगर महानगरपालिका
- अकोला महानगरपालिका
- अमरावती महानगरपालिका
- भिवंडी निजामपूर महानगरपालिका
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- चंद्रपूर महानगरपालिका
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
- धुळे महानगरपालिका
- इचलकरंजी महानगरपालिका
- जळगाव महानगरपालिका
- जालना महानगरपालिका
- कल्याण डोंबिवली महानगरपालिका
- कोल्हापूर महानगरपालिका
- लातूर महानगरपालिका
- मालेगाव महानगरपालिका
- मीरा भाईंदर महानगरपालिका
- नागपूर महानगरपालिका
- नांदेड वाघाळा महानगरपालिका
- नाशिक महानगरपालिका
- नवी मुंबई महानगरपालिका
- पनवेल महानगरपालिका
- परभणी महानगरपालिका
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका
- पुणे महानगरपालिका
- सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका
- सोलापूर महानगरपालिका
- ठाणे महानगरपालिका
- उल्हासनगर महानगरपालिका
- वसई विरार महानगरपालिका
विभागनिहाय माहिती –
दरम्यान, जिथे निवडणूक होणार आहे त्या 29 महापालिका आहेत. यामध्ये एमएमआरडीए मधील 9, पश्चिम महाराष्ट्रातील 6, उत्तर महाराष्ट्र 5, मराठवाडा 5 आणि विदर्भातील 4 पालिकांचा समावेश आहे. वाचा त्यांची संपूर्ण यादी
एमएमआरडीए –
1) मुंबई
2) नवी मुंबई
3) ठाणे
4) कल्याण डोंबिवली
5) वसई विरार
6) भिवंडी
7) पनवेल
8) मिरा भाईंदर
9) उल्हासनगर
पश्चिम महाराष्ट्र –
1) पुणे
2) पिंपरी चिंचवड
3) कोल्हापूर
4) सांगली
5) सोलापूर
6) इचलकरंजी
उत्तर महाराष्ट्र –
1) नाशिक
2) अहिल्यानगर
3) धुळे
4) जळगाव
5) मालेगाव
मराठवाडा –
1) छत्रपती संभाजीनगर
2) लातूर
3) नांदेड – वाघाळा
4) परभणी
5) जालना
विदर्भ –
1) नागपूर
2) अकोला
3) अमरावती
4) चंद्रपूर
दोन नवनिर्मित महानगरपालिकांचा समावेश
राज्यातील महानगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकां जाहीर झाल्या आहेत. यात मुदत संपलेल्या 27 महानगर पालिकांचा समावेश आहे, तर जालना आणि इचलकरंची या दोन नवनिर्मित महानगर पालिका आहेत. मुंबई महानगर पालिकेत एक सदस्यीय प्रभाग आहे, प्रत्येक मतदाराला एक मत द्यावे लागेल. इतर महानगर पालिकांमध्ये एका प्रभागातून तीन ते पाच उमेदवार निवडून द्यावे लागतील. त्यामुळे मतदारांना तीन ते पाच मतदान करावे लागणार आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



