ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ हैद्राबाद- नांदेडहून आता सुरत, अहमदाबाद, जोधपूर मार्गे बिकानेरला रेल्वे धावणार आहे. काचिगुडा ते बिकानेर या विशेष रेल्वेच्या १६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
दक्षिण मध्य रेल्वे ने काचिगुडा ते बिकानेर दरम्यान विशेष गाडीच्या १६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. मे आणि जून २०२३ या दोन महिन्यांत ही विशेष रेल्वे धावणार आहे. त्याची माहिती पुढील प्रमाणे : –
गाडी क्रमांक ०७०५३ काचिगुडा ते बिकानेर ही विशेष गाडी काचीगुडा येथून दर ६ मे ते २४ जून दरम्यान दर शनिवारी रात्री २१.३० वाजता सुटेल आणि मेडचल, वाडियाराम, कामरेड्डी, निजामाबाद, बासर मुदखेड, नांदेड,पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव,जळगाव, भुसावळ, मलकापूर, नंदुरबार, सुरत , वडोदरा, गेरतपूर, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड, पाली मारवाड, लुनी, जोधपूर,गोतान, मेरता रोड, नागौर आणि नोखा मार्गे बिकानेर येथे सोमवारी दुपारी १३.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०७०५४ बिकानेर – काचिगुडा ही विशेष गाडी बिकानेर येथून दिनांक ०९ मे ते २७जून दरम्यान दर मंगळवारी रात्री २०.१५ वाजता सुटेल आणि आलेल्या मार्गाने काचीगुडा येथे गुरुवारी सकाळी ०९.४० वाजता पोहोचेल.
वेळापत्रक 👇🏻
या गाड्यांमध्ये फर्स्ट एसी, २ एसी, ३ एसी, स्लीपर आणि जनरल सेकंड क्लास कोच असणार आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻