ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेडहून पाच शहरांसाठीच्या विमानसेवेचे वेळापत्रक 👇🏻
नांदेड – येत्या ३१ मार्चपासून नांदेड पाच मोठ्या शहरांशी जोडले जाणार आहे. नांदेडहून दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर, जालंदर, अहमदाबाद अशी विमानसेवा ३१ मार्चपासून सुरू होत आहे. स्टार एयरची ही विमानसेवा असून या विमानांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. दिल्ली, जालंदर आणि बेंगलोरसाठी तर दररोज विमानसेवा असणार आहे.
मागील अनेक वर्षापासून बंद पडलेली नांदेडची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे. नांदेड ते पुणे ही विमानसेवा लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर आता देशातील पाच मोठ्या शहरांना नांदेडशी विमानसेवेने जोडण्यात येत आहे. ३१ मार्चपासून नांदेडहून दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर, जालंदर, अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू होत आहे. दिल्ली, जालंदर आणि बेंगलोर साठी तर दररोज विमानसेवा असणार असून हैद्राबाद आणि अहमदाबाद साठी आठवड्यातून पाच दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शनिवार आणि रविवारी अशी ही सेवा असणार आहे.
मागील तीन वर्षापासून नांदेडहून विमानसेवा बंद होती. त्यामुळे नांदेडकरांसह देश- विदेशातील शीख बांधवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या विमानसेवांमुळे सर्वांची मोठी सोय होणार आहे. ३१ मार्चपासून नांदेडहून दिल्ली, हैद्राबाद, बेंगलोर, जालंदर, अहमदाबाद या मार्गावरील विमानांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून तिकीट बुकिंगही सुरू करण्यात आले आहे.
या विमानसेवांमुळे नांदेडची मोठ्या शहरांशी कनेक्टिव्हिटी चांगली होणार असून आता नांदेडकरांना यात्रेकरूंना रेल्वे किंवा खासगी वाहनांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. तब्बल तीन वर्षानंतर सुरू होणाऱ्या विमानसेवेमुळे नांदेडकरांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻