Thursday, November 21, 2024

नांदेड आज 500 पार !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहर आणि जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरूच असून आज शुक्रवारी तर कोरोना रुग्णसंख्येने 500 चा आकडा पार केला आहे. आज 553 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

संबंधित बातमी : 26 26 26: वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मदतीसाठी कंट्रोल रूम सुरू https://godateer.com/26-26-26-वाढत्या-कोरोनाच्या-पार/

जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 658 अहवालापैकी 553 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 475 तर अँटिजेन तपासणीद्वारे 78 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 92 हजार 742 एवढी झाली असून यातील 88 हजार 226 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 861 रुग्ण उपचार घेत असून 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 290, नांदेड ग्रामीण 31, अर्धापूर 7, भोकर 5, देगलूर 1, धर्माबाद 3, हदगाव 5, हिमायतनगर 1, कंधार 19, किनवट 25, लोहा 12, माहूर 2, मुदखेड 1, मुखेड 16, नायगांव 4, उमरी 2, अमरावती 7, औरंगाबाद 1, पुणे 3, हिंगोली 9, परभणी 20, नागपूर 1, वर्धा 1, वाशिम 3, यवतमाळ 1, कोल्हापूर 1, निजामाबाद 2, पंजाब 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 22, नांदेड ग्रामीण 4, भोकर 2, बिलोली 7, देगलूर 3, धर्माबाद 7, कंधार 33, किनवट 10, लोहा 1, माहूर 2, मुदखेड 2, मुखेड 9, नायगाव 6 असे एकूण 553 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 10, खाजगी रुग्णालय 1, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2 कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  
 
आज 1 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 389, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 1 हजार 432,  खाजगी रुग्णालय 18 अशा एकुण 1 हजार 861 व्यक्ती उपचार घेत आहेत.
 
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 14 हजार 361
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 7 हजार 671
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 92 हजार 742
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 226
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.13 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-21
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-56
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-1 हजार 861
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!