Friday, November 22, 2024

नांदेड जिल्ह्यात आज कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली; 611 नवे रुग्ण, 4 मृत्यू; 602 बाधित झाले बरे

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– गेली दोन दिवस काहीसा आकडा कमी झालेले असताना, जिल्ह्यात आज बुधवारी कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. आज प्राप्त झालेल्या 1 हजार 684 अहवालापैकी 611 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 517 तर अँटिजेन तपासणीद्वारे 94 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 44 एवढी झाली असून यातील 93 हजार 174 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 206 रुग्ण उपचार घेत असून यात 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे धनेगाव नांदेड येथील 70 वर्षाचा एक पुरुष, हडको येथील 77 वर्षाचा पुरुष, हदगाव तालुक्यातील नेवरी 63 वर्षाची महिला, हदगाव येथील 62 वर्षाच्या पुरुषाचा मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 664 एवढी आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 327, नांदेड ग्रामीण 57, भोकर 10, देगलूर 2, धर्माबाद 2, कंधार 6, हदगाव 1, किनवट 46, लोहा 15, मुदखेड 2, मुखेड 15, हिमायतनगर 2, औरंगाबाद 2, अर्धापूर 3, बिलोली 3, नायगाव 2, माहूर 6, परभणी 4, हिंगोली 5, यवतमाळ 2, अकोला 1, आदिलाबाद 2, पंजाब 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 17, नांदेड ग्रामीण 1, अर्धापूर 3, बिलोली 15, देगलूर 2, धर्माबाद 10, हदगाव 2, किनवट 17, मुखेड 14, नायगाव 12, उमरी 1 असे एकुण 611 कोरोना बाधित आढळले आहे.

आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 470, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 110, खाजगी रुग्णालय 12, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, हदगाव कोविड रुग्णालय 4 असे एकुण 602 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.

उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 36, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 159,  नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 2 हजार 968, किनवट कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 38 असे एकुण 4 हजार 206  व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती-
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 37 हजार 35
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 21 हजार 890
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 44
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 93 हजार 174
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 664
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.13 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-30
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-49
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 206
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-3.

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!