ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
वीजचोरी करणाऱ्या 68 जणांवर गुन्हे दाखल
नांदड: वीजचोरीला आळा घालणे व वीज गळती कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने वीजचोरांवर धडक कारवाई करत असते. माहे जून ते नोव्हेंबर 2021 या सहा महिन्याच्या कालावधीत नांदेड परिमंडळातील 3 हजार 611 ग्राहकांच्या वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. या वीजचोरांनी तब्बल 5 कोटी 72 लाख रूपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न् झाले आहे. या वीजचोरांवर विद्युत कायद्यान्वये कारवाई करत चोरून वापरलेल्या युनिटचे देयक आणि दंडाची रक्क्म असे एकत्रीत देयक देण्यात आले असून 68 वीजचोरांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नांदेड परिमंडळांतर्गत येणाऱ्या नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हयांमधे वीजचोरांवरती जून ते नोव्हेंबर 2021 या सहा महिन्याच्या काळात धडक कारवाई करत आकडा टाकून वीजवापरने, मीटर मध्ये छेडछाड करने अशा प्रकारच्या एकूण 3 हजार 611 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. या सर्व वीजचोरांवरती विद्युत कायदा 2003 नुसार कलम 126 व 135 अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत नांदेड जिल्हयातील 1844 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. या वीजचोरांनी 17 लाख 71 हजार 438 युनीटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले असून चोरी व दंडाची रक्क्म असे एकत्रीत 2 कोटी 73 लाखांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर परभणी जिल्हयातील 1 हजार 77 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. या वीजचोरांनी 13 लाख 33 हजार 620 युनीटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले असून चोरी व दंडाची रक्क्म असे एकत्रीत 2 कोटी 28 लाखांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे. तर हिंगोली जिल्हयातील 690 वीजचोऱ्या पकडण्यात आल्या आहेत. या वीजचोरांनी 4 लाख 34 हजार 33 युनीटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले असून चोरी व दंडाची रक्क्म असे एकत्रीत 72 लाखांची वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे.
वीजचोरी व दंडाची रक्कम असे एकत्रीत देयक वीजचोरी केलेल्या सर्व ग्राहकांना देण्यात आले असून नांदेड जिल्हयातील 338 ग्राहकांकडून 58 लाख 63 हजार रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर 51 वीजचोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच परभणी जिल्हयातील 112 ग्राहकांकडून 11 लाख 52 हजार रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर 15 वीजचोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हिंगोली जिल्हयातील 204 ग्राहकांकडून 21 लाख 66 हजार रुपयांची वसूली करण्यात आली आहे. तर 2 वीजचोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरीत वीजचोरणाऱ्या ग्राहकांना वीज कायद्यान्वये देयक पाठवण्यात आली असून वसुली करण्याची कारवाई सुरू आहे. वीजग्राहकांनी वीजचोरीच्या फांद्यात न पडता अधिकृतरित्या वीज वापर करावा अन्यथा आर्थिक भुर्दंडासोबतच प्रसंगी कारावासाची शिक्षाही भोगावी लागते. त्यामुळे वीज अधीकृतरित्याच वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻