ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ 5 जुलै पासून रोज धावणार, गाडी क्रमांकात बदल
नांदेड- नांदेड ते पुणे नवीन रेल्वे गाडी मिळाली आहे. सध्या आठवड्यातून दोन वेळा नांदेड-हडपसर अशी रेल्वे गाडी आता दररोज पुणे स्टेशनपर्यंत धावणार आहे. दिनांक ५ जुलै पासून ही गाडी रोज धावणार असून गाडी क्रमांकातही बदल करण्यात आला आहे.
नांदेडसह एकूणच मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक १२७३०/१२७२९ या द्वी-साप्ताहिक एक्स्प्रेसची वारंवारता वाढवून दैनंदिन करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाची बाब म्हणजे, ही गाडी आता हडपसरऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे. तसेच पुण्याहून सुटणारही आहे.
दिनांक ५ जुलै, २०२२ पासून ही नांदेड-पुणे- नांदेड ही दैनंदिन रेल्वे सेवा सुरु होणार आहे. ही रेल्वे नवीन क्रमांकाने सुरु होणार असून या गाडीचा १२७३०/१२७२९ हा क्रमांक बदलून १७६३०/१७६२९ असा करण्यात आला आहे. या गाडीचे पहिली/ उद्घाटन ङ्गेरी दिनांक ४ जुलै २०२२ रोजी जालना येथून सुटेल. पूर्वीच्या नांदेड-हडपसर एक्स्प्रेसचे गंतव्य स्थानक बदलून ते नांदेड-पुणेअसे करण्यात आले आहे. यामुळे मराठवाड्यातून पुण्याला प्रवास करणार्या मराठवाड्यातील लोकांसाठी हे अत्यंत सोयीस्कर झाले आहे. मराठवाड्यातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रात्री सोयीच्या वेळेनुसार ही रेल्वे गाडी चालवली जात आहे. जेणेकरून ते सकाळी लवकर पुणे स्टेशनवर पोहोचेल.
गाडी क्रमांक १७६३० नांदेड – पुणे एक्स्प्रेस नांदेड स्थानकातून दररोज दुपारी १५.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी ०५.३० वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. परतीच्या प्रवासात, गाडी क्रमांक १७६२९ पुणे – नांदेड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून रात्री २१.३५ वाजता सुटेल आणि नांदेड स्थानकावर सकाळी १०.२० वाजता पोहोचेल.
ही ट्रेन मराठवाड्याला महाराष्ट्र राज्यातील औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे ला थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करणारी ठरणार आहे. आरामदायक प्रवासात वाढ करण्यासाठी आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी, ट्रेनमध्ये नवीन अत्याधुनिक ङकइ कोच (डब्बे) जोडण्यात आले आहेत, जे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा नवीन अनुभव देणार आहेत. प्रवाशांना निर्धोक आणि सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने डब्यांच्या आत आणि प्रवेश दारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे अनधिकृत व्यक्तींच्या प्रवेशावर लक्ष ठेवण्यास मदत करतील.
१. गाडी संख्या १७६३० नांदेड-पुणे एक्स्प्रेस : ह गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी १५.१५ वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे पुणे रेल्वे स्थानकावर दुसर्या दिवशी सकाळी ०५.२० वाजता पोहोचेल.
२.गाडी संख्या १७६२९ पुणे ते नांदेड एक्स्प्रेसही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून रोजी रात्री २१.३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी मार्गे हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दुसर्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता पोहोचेल.
३.या गाडीत १५ डब्बे असतील ज्यात वातानुकुलीत प्रथम श्रेणी, वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, वातानुकुलीत तृतीय श्रेणी, द्वितीय शय्या (स्लीपर क्लास ) आणि जनरल चे डब्बे असतील.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻