ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा दाखल असलेल्या गुन्ह्यातील दिपक चांदोबा कांबळे (वय ३५) रा. तथागतनगर, नांदेड याला हैद्राबाद विमानतळावरून सिनेस्टाईल अटक केली. राजीव गांधी विमानतळावरून विमान टेकऑफ करण्याच्या अगदी काही वेळेआधी शिवाजीनगर पोलिसांनी अटकेची ही कारवाई केली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन दिवसापूर्वी संबंधित आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. मात्र त्याच्या मोबाईल लोकेशन आणि इतर माध्यमातून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे हे आपल्या पथकासह त्याच्यावर लक्ष ठेवून होते. विशेष म्हणजे आरोपी हा त्रिवेंद्रम येथे मोठ्या कंपनीमध्ये कार्यरत आहे.
तो हैद्राबाद येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने सदरील माहिती पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व उप विभागीय पोलीस अधिकारी (शहर) चंद्रसेन देशमुख यांना देवुन आरोपीच्या शोधकामी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ रवाना केले.
तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी हैद्राबाद येथे जावुन आरोपीचा शोध घेत असतांना सदरील आरोपी हा केरळ राज्यातील त्रिवेन्द्रम येथे विमानाने जाण्याचे तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठले. विमानतळावर जावुन सुरक्षा अधिकारी यांचे मदतीने सिनेस्टाईल कारवाई करीत आरोपीस ताब्यात घेतले. सदर आरोपी हा विमानामध्ये बी- 34 या सीटवर बसला होता. आता आपण पोलिसांना चकवले असे मानून बिनधास्त प्रवासाच्या तयारीत असतानाच एपीआय रवी वाव्हुळे यांनी विमानतळ पोलिसांच्या मदतीने त्याला अटक करून खाली उतरवले.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख व पोलीस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील प्रमुख सपोनि रवि वाहुळे, पो.उप.नि मिलींद सोनकांबळे, हवालदार शेख इब्राहीम, दिलीप राठोड, रविशंकर बामणे, देविसिंग सिंगल, शेख अझहर, दत्ता वडजे, दिपक ओढणे, राजेन्द्र सिटीकर यांनी परिश्रम घेतले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻