ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– येथील हजूर साहेब रेल्वे स्थानकावर देखभाल व दुरुस्तीसाठी थांबविलेल्या एका रेल्वे बोगीला अचानक आग लागली. या आगीत रेल्वे बोगी पूर्णतः जळून खाक झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी धावाधाव करत या आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने ही बोगी प्रवासी रेल्वेला जोडलेली नव्हती.
नांदेडच्या हुजूर साहेब रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एक रेल्वे गाडी नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी उभी होती. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर रोजी सकाळी नऊच्या सुमारास यातील एका बोगीला अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि काही वेळातच बोगी अक्षरशः जळून खाक झाली. तोपर्यंत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धावाधाव करत आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजले नसून रेल्वेचे अधिकारी याविषयी बोलायला तयार नव्हते. दरम्यान रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची मात्र यामुळे धावपळ उडाली होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻