Thursday, November 21, 2024

नांदेड शहरात भूकंपाचे सौम्य धक्के; भयभीत होऊन नागरिक घराबाहेर पडले; 1.5 रिश्टर स्केल धक्क्याची नोंद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- येथील महापालिका हद्दीत असलेल्या काही परिसरात आज दि. ३ रोजी सायंकाळी ६.१८ वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यावेळी घरे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावरील आधारित प्राथमिक अहवालानुसार 1.5 रिश्टर स्केल तीव्रता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरातील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर, शिवाजीनगर, पोलीस कॉलनी आदी भागात आज आवाजासह धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले होते. यावेळी सायन्स कॉलेज परिसरात केंद्र बिंदू असल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध माहितीनुसार सदर धक्क्याची नोंद 1.5 रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात आले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!