ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७९.०४ टक्के मतदान
नायगाव बाजार- नायगाव नगरपंचायतच्या ११ प्रभागासाठी १३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले असून २७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ७९.०४ टक्के मतदान झाले आहे.
नायगाव नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि.२१ रोजी मतदान पार पडले आहे. १७ सदस्य असलेल्या नगरपंचायतमध्ये ओबीसीच्या ३ जागेवरील निवडणूक स्थगित झाली. तर ३ जागा बिनविरोध निवडून आल्याने मंगळवारी ११ जागेसाठी मतदान झाले. यात ११ काँग्रेस, ११ भाजप, ३ शिवसेना व २ अपक्ष उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदान संथगतीने झाले तर ११ च्या नंतर मात्र मतदानाने गती घेतल्याचे दिसून आले. दुपारी १.३० वाजेपर्यंत सरासरी ५४ टक्के मतदान झाले होते. तर सायंकाळी ५.३० पर्यंत ७९.०४ मतदान झाले असून एकूण ८०९३ मतदानापैकी ६३९७ मतदान झाले. यात ३३२५ पुरुष तर ३०७२ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻