ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– अर्धापूर तालुक्यातील जांभरून येथे नोकरानेच घर मालकाच्या घरी डल्ला मारून कपाटातील सोन्या- चांदीचे अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले.
अर्धापूर तालुक्यातील जांभरून येथील शेतकरी कोंडीबा माधवराव जिंके (वय ६१) यांनी शेत व घरकामासाठी गावातील (जांभरून) येथील गंगाधर पंडित भोळे (वय ४०) याला कामावर ठेवले होते. परंतु 6 फेब्रुवारी रोजी घरी कोणीच नसल्याची संधी साधून गंगाधर भोळे याने घरामधील कपाटात ठेवलेले सोन्या- चांदीचे दागिने (दोन लाख ४४ हजार ११४) रुपयांचा ऐवज चोरून नेला. चौकशीअंती गंगाधर भोळे याने चोरी केल्याचे समजल्यानंतर कोंडीबा जिंके यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गंगाधर पंडित भोळे याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻