ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 साठी नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील घोडज येथील कामेश्वर जगन्नाथ वाघमारे यांची निवड झालेली आहे.
भारतातील निवड झालेल्या राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांची लवकरच आभासी पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. यात नांदेड जिल्ह्याच्या कंधार तालुक्यातील कामेश्वरचाही समावेश असणार आहे. कामेश्वरच्या माध्यमातून जिल्ह्यातील बालकांचा एक प्रकारे गौरव झाला असून याबद्दल कामेश्वरचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
जिल्ह्यातील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आपल्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने नदीच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण वाचवले होते. गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात दुपारच्या वेळेत तीन बालक बुडत असतांना कामेश्वरने पाहिलं. पाहताच क्षणी पाण्यात उडी घेऊन त्याने जिवाची पर्वा न करता दोघांना बाहेर काढले. एका मुलाला वाचवण्यात तो अयशस्वी राहिला, पण दोघांचे जीव त्याच्यामुळे वाचले. त्याच्या या शौर्याबद्दल त्याला केंद्र सरकारच्यावतीने बाल शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻