ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– राज्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पूनर्वसन व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज रविवार, १५ मे रोजी दैनिक गोदातीर समाचार कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
शनिवार दि. १४ आणि १५ मे रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी आज रविवार दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता ‘दै. गोदातीर समाचार’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. मुख्य संपादक केशव घोणसे पाटील यांनी नामदार बनसोडे यांचे स्वागत केले. यावेळी ना. संजय बनसोडे यांच्या समवेत उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बसवराज पाटील नागराळकर यांचेही स्वागत मुख्य संपादक केशव घोणसे पाटील आणि पत्रकार शशिकांत घोणसे पाटील यांनी केले. यावेळी रामदास पांचाळ, रमेश चित्ते, प्रल्हाद कांबळे, रमेश ठाकूर, बालाजी सूर्यवंशी यांच्यासह गोदातीर समाचार परिवारातील अनेकांची उपस्थिती होती. सारंग नेरलकर, श्रीधर हंबर्डे, चंद्रकांत गव्हाणे, अण्णाराव वैद्य, ज्ञानेश्वर सुनेगावकर, करणसिंह बैस आदींही उपस्थित होते. आशुतोष, हर्षवर्धन आणि आरोही घोणसे पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती.
मराठवाड्यातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह दैनिक म्हणून गोदातीर समाचारची ओळख आहे. मी अगोदरपासून ‘गोदातीर समाचार’चा वाचक आणि चाहता असल्याचे ना. संजय बनसोडे यांनी सांगितले. गोदातीर समाचारमधील बातम्या, संपादकीय हे अतिशय विश्वासार्ह असतात. मुख्य संपादक केशव घोणसे पाटील यांच्या उपक्रमशीलतेमुळे ‘गोदातीर समाचार’ने आता कात टाकली असून डिजिटल माध्यमातही पाय रोवत, मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग निर्माण केल्याची बाब त्यांच्या विश्वासार्हतेची पावती देणारी असल्याचे गौरवोद्गार ना. बनसोडे यांनी काढले. तसेच दै.गोदातीर समाचारच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻