Wednesday, January 22, 2025

पिस्टलसह इतर शस्त्रे विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला पोलिसांनी पकडले; दोन पिस्तुलांसह घातक शस्त्र जप्त, दहा आरोपींना अटक

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांची कारवाई

नांदेड– पिस्टलसह इतर शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या, त्याचबरोबर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह घातक शस्त्र जप्त करण्यात आली असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांनी ही कारवाई केली.

शहराच्या नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून फरार असलेल्या आणि यातील काही जण शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या अशा टोळीला उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली इतवारा आणि नांदेड ग्रामीण पोलिसांच्या टीमने अटक केली आहे. एकूण दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतूस, सहा खंजर, एक तलवार, तीन मोबाईल आणि सहा तोळे सोन्याचे दागिने असा सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आज गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारी संबंधाने अवैधरित्या अग्नीशस्त्रे विक्री करणे, अग्नीशस्त्राचा वापर करणे, सोबत बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, चोरी वाढत्या प्रमाणाबाबत पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ. खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी  सुशीलकुमार नायक यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन यांना मासीक गुन्हे बैठकीच्यावेळी सुचना देऊन वरील गुन्ह्यांना आळा घालुन आरोपीताचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करणेबाबत आदेशीत केले होते.

दिनांक २८ नोव्हेंबर रोजी पो.स्टे. नांदेड ग्रामीणचे प्रभारी अधिकारी सपोनी श्रीधर जगताप यांना गोपनिय माहिती मिळाली की, काही इसम हे अग्नीशस्त्र व हत्यारे विक्री करण्याचे उद्देशाने विष्णुपुरी परिसरात थांबून आहेत. या माहितीवरुन त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक यांना सदर ठिकाणी पाठविले. या मिळालेल्या माहितीनुसार विष्णुपुरी येथील काळेश्वर कमानीजवळ पोलिसांनी सापळा रचून  पाच इसमाना ताब्यात घेतले. आनंद ऊर्फ चिन्नु सरदार यादव (वय २३ वर्ष, रा, वजिराबाद चौरस्ता नांदेड), रोहित विजयकुमार कदम (वय २० वर्ष रा. दत्त मंदीराचे मागे विष्णुपुरी नांदेड), रवि ऊर्फ रविलाला नारायणसिंह ठाकुर (वय ३३ वर्ष, रा. दर्गाजवळ गाडीपुरा नांदेड), कृष्णा पिराजी गायकवाड (वय २४ वर्ष व्यवसाय चालक रा धनगरवाडी), प्रविण एकनाव हंबर्डे (वय २० वर्ष व्यावसाय मजुरी रा, हनुमान मंदीर जवळ काळेश्वर रोड विष्णुपुरी, नांदेड) अशी त्यांची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या इसमांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचेकडे दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुस, सहा खंजर, एक तलवार, व एक लोखंडी कत्ती, दोन दुचाकी असा एकूण दोन लाख ३५ हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी ही सर्व शस्त्रे जप्त केली. त्यांचेवर पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे गुरनं. ८५०/२०२३ कलम ३/२५,४/२५,७/२५ शस्व अधिनियम सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास पोउपनि महेश कोरे व पोहेको सुनिल गटलेवार यांचेकडे देण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात नमुद आरोपीतांकडे जबरी चोरी, चेन स्नॅचिग, घरफोडीच्या गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी त्यांचे आणखीन इतर साथीदार  लोशन गोपाळ पदमवार रा. विष्णुपुरी नांदेड,  हरिष देविदास शर्मा रा वजिराबाद नांदेड, परमेश्वर बबन कंधारे रा. विष्णुपुगे नांदेड, विशाल उर्फ पप्पु नारायण हंबडे रा. विष्णुपुरी नांदेड, रूपेश बालाजी ठाकुर रा. विष्णुपुरी नांदेड, शेख जावेद उर्फ लड्या रा. विष्णुपुरी नांदेड यांचेसह मिळून वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून असे एकुण नऊ आरोपीतांकडून सहा तोळे सोन्याचे दागिने, तीन मोबाईल, दोन पिस्टल व तीन जिवंत काडतुस सहा खंजर, एक तलवार, एक लोखंडी कत्ती, दोन दुचाकी असा एकुण तीन लाख पंचवीस हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांकडून नांदेड ग्रामीण ठाण्यातील तीन, सोनखेड एक तर इतवारा पोलिसांना हद्दीत असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक  अबिनाशकुमार, डॉ. खंडेराय धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी (इतवारा)  सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीणचे पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनी श्रीधर जगताप व गुन्हे शोध पथक प्रमुख आनंद बिच्चेवार, पोहेकोआ प्रभाकर मलदोडे, पोहेको विक्रम वाकडे, पोहेकों संतोष जाधव, पोहेकी ज्ञानोचा कवठेकर, पोना शेख सत्तार, पोना अर्जुन मुंडे, पोको चंद्रकांत स्वामी, संतोष बेलुरोड, पोकों ज्ञानेश्वर कलंदर, पोको श्रीराम दासरे, पोको माधव माने, पोकों शिवानंद तेजबंद, पोकों शिवानंद कानगुले, इतवाराचे पोलीस उपनिरीक्षक असद शेख, रहिम चौधरी यांनी बजावली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!