ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ अमरावतीचे गौहर हसन ग्रामीण नांदेड उपविभागात
नांदेड- नांदेडचे अधिकारी नागपूरला बदलून जाण्याचे सत्र सुरूच आहे. आज भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्याचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी जारी केल्या आहेत. यात बिलोली उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची बदली नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदी करण्यात आली आहे.
तसेच मागील दोन महिन्यापासून रिक्त असलेल्या नांदेड ग्रामीण उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधीक्षक पदी अमरावती ग्रामीणमधील धामणी उपविभागाचे गौहर हसन यांना पाठविण्यात आले आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांनी तात्काळ आपल्या पदाचा पदभार घेऊन वरिष्ठ कार्यालयाला तसा अहवाल कळवावा असे आदेशात नमूद केले आहे. अर्चीत चांडक यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी अजून कुणाचीही वर्णी लागलेली नाही.
दरम्यान, नांदेडहून अधिकारी बदलून नागपूरला जाण्याचे गेल्या काही काळापासून सुरू झालेले सत्र अजूनही सुरूच असल्याचे आयपीएस चांडक यांच्या बदलीवरून दिसून येत आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांची नागपूर महसूल आयुक्तालयात उपायुक्तपदी, सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, त्यानंतर आता आयपीएस अर्चित चांडक यांची नांदेड जिल्ह्यातून सहाय्यक पोलीस अधीक्षक पदावरून नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर बदली झाली आहे.
नांदेडहून अधिकारी नागपूरला जाण्याच्या सत्राची जोरदार चर्चा येत होत आहे. यामागच्या कारणांचाही प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लावत असल्याचे दिसत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻