ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ आज 454 नवे रुग्ण तर 510 रुग्ण झाले बरे
नांदेड– शहर आणि जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पण आज सोमवारी याबाबत काहीशी दिलासादायक बातमी आली असून सोमवारी कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकुण 454 नवे रुग्ण आढळून आले असून 510 रुग्ण बरे झाले आहेत.
आज एकूण 1746 टेस्टिंग पैकी 454 पॉझिटिव्ह निघाले आहेत. पैकी मनपा हद्दीतील रुग्ण संख्या 234 आहे. आज 510 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आज एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 746 अहवालापैकी 454 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 330 तर अँटिजेन तपासणीद्वारे 124 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 99 हजार 433 एवढी झाली असून यातील 92 हजार 572 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 4 हजार 201 रुग्ण उपचार घेत असून यात 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील 68 वर्षाच्या एका महिलेचा सोमवार 24 जानेवारी रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 660 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 211, धर्माबाद 5, लोहा 15, हिमायतनगर 1, माहूर 2, पुणे 1, वाशीम 2, नांदेड ग्रामीण 28, कंधार 9, मुदखेड 3, अर्धापूर 3, परभणी 8, उमरखेड 2, निजामाबाद 1, भोकर 2, हदगाव 2, मुखेड 4, बिलोली 2, हिंगोली 2, मुंबई 1, चंदिगड 1, देगलूर 13, किनवट 3, उमरी 1, नायगाव 5, यवतमाळ 1, औरंगाबाद 1, उत्तर प्रदेश 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा 23, देगलूर 5, माहूर 3, नांदेड ग्रामीण 14, धर्माबाद 25, मुदखेड 2, अर्धापूर 4, कंधार 1, नायगाव 16, बिलोली 13, किनवट 18 असे एकुण 454 कोरोना बाधित आढळले आहे.
आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 398, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 96, खाजगी रुग्णालय 11, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 1 असे एकुण 510 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली.
उपचार घेत असलेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 39, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 5, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 3 हजार 97, हदगाव कोविड रुग्णालय 4, खाजगी रुग्णालय 34, किनवट कोविड रुग्णालय 2 असे एकुण 4 हजार 201 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती–
एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 35 हजार 351
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 20 हजार 896
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 99 हजार 433
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 92 हजार 572
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 660
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.09 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-3
आज स्वॅब नाकारण्यात आलेली
संख्या-49
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-4 हजार 201
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻