Friday, November 22, 2024

पेट्रोल पंप मालकावर खंजरने वार करीत पावणे दोन लाख रुपये लुटले; अर्धापूर-नांदेड रोडवरील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अर्धापूर (जि. नांदेड)- धारदार खंजरचा वार करत एका पेट्रोल पंप मालकास गंभीर जखमी करून त्यांच्या जवळील सुमारे पावणे दोन लाख रुपये लुटण्यात आल्याची घटना नांदेड-अर्धापूर रोडवर घडली आहे. यावेळी नगदी रकमेसह मोबाईल घेऊन अज्ञात चोरटे पसार झाले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्धापूर- नांदेड रस्त्यावर जांभरुन हद्दीत दुध डेअरीसमोर रस्त्यावर पेट्रोल पंपाचे मालक मोहम्मद मुस्तफा अली खान, रा.किल्ला रोड, नांदेड हे गुरुवारी रात्री पावने अकराच्या सुमारास पेट्रोल पंपातील जमा झालेली रक्कम १ लाख ७१ हजार ६० रूपये घेऊन घरी नांदेड कडे निघाले होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या २ मोटरसायकल वरील अज्ञात ४ चोरट्यांपैकी एकाने गाडीला धक्का दिला. तर दुसऱ्याने पोटावर खंजरचा वार करण्याचा प्रयत्न केला असता मोहम्मद मुस्तफा अली खान यांनी बचावासाठी खंजरचा वार हाताने अडवला. यात त्यांच्या उजव्या हाताच्या दोन बोटांना जबर मार लागला आहे. या सर्व प्रकारात तर मोटारसायकलसह खाली पडले असता चोरट्यांनी त्यांच्या जवळील १ लाख ७१ हजार ६० रुपये नगदी असलेली पैशांची बॅग आणि १७ हजार रुपयांचे २ मोबाईल असा एकूण मुद्देमाल १ लाख ८८ हजार ६० रुपये चोरट्यांनी हिसकावून घेत तेथून पळ काढला.

याप्रकरणी मोहम्मद मुस्तफा अली खान यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लुटमार प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!