Wednesday, December 25, 2024

पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला; किनवट तालुक्यात पुलांवरुन पाणी, मराठवाडा- विदर्भ वाहतूक बंद, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले: व्हिडिओ 👇🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट/ माहूर (जि. नांदेड)- पैनगंगा नदीला पूर आल्याने माहूर, किनवट मार्गावर सखलभागात पाणी साचले आहे. माहूरसह सहस्त्रकुंड धबधबा व इतर स्थळांना दर्शन व पर्यटनासाठी दोन दिवस पूर ओसरेपर्यंत न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

माहूर परिसरात काल रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पैनगंगा नदी काठच्या गावात पूर आला आहे. जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाच्या टीम जागोजागी तैनात करण्यात आल्या आहेत. किनवट धानोडा पुलावरुन पाणी वाहू लागले असून त्यामुळे याठिकाची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

किनवट येथील मोमीनपुरा वस्तीत पुराचे पाणी शिरले असून प्रशासनाकडून या ठिकाणच्या ८० लोकांचे उर्दू शाळेत स्थलांतर केले आहे. तहसीलदार व टीम जागेवर हजर झाले असून लोकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

अतिवृष्टीमुळे पैनगंगेला पूर आला आहे. या पुरामुळे माहूर जवळ टाकळी येथे पुरात आडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी बचावपथके रवाना झाली असून प्रशासनाची टीम संपर्क ठेवून जागेवर हजर आहे.

राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात आणि नांदेड, हिंगोली, परभणी आणि पूर्व विदर्भात पावसाच जोर कायम आहे. तसंच हवामान खात्याने आजही राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यात दोन दिवसांपासूनच संततधार पाऊस सुरु आहे. किनवट, माहूर, मुखेड, बिलोली, धर्माबाद, देगलूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!