ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहरात गावठी पिस्टल मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. काल बुधवारी रात्री पोलिसांनी पुन्हा गावठी पिस्टल पकडले असून एक बनावट पिस्टलही जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सक्त सुचना दिल्या आहेत.
सदर सुचनांचे अनुषंगाने वजिराबाद पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक वजिराबादचे अधिकारी व अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व लॉजेस चेक केल्या. तसेच अभिलेखावरील अवैध शस्त्र बाळगणारे व इतर एकुण 54 गुन्हेगारांना चेक करून मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. याच दरम्यान दि. 13 एप्रिल रोजी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र प्रकरणातील गुन्हेगारांची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरून आरोपी कृष्णा मनोहर गजभारे (वय 25 वर्षे) व्यवसाय मजुरी रा. धनगरवाडी, विष्णुपुरी जवळ ता. जि. नांदेड यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे कमरेला एक अग्निशस्त्रासारखे दिसणारे पिस्टल आढळुन आले. तो एखादा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना आढळून आल्याने त्यांचेविरुध्द पो.स्टे. वजिराबाद येथे गु.र.न.108 / 2022 कलम 6/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोहेका साहेबराव आडे हे करीत आहेत.
ही कारवाई गुन्हे शोध पथक वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोहेकों दत्तराम जाधव, पोना गजानन किडे, पोना विजयकुमार नंदे, पोना मनोज परदेशी पोना शरदचंद्र चावरे, पोकॉ शेख ईम्रान, पोकॉ व्यंकट गंगुलवार, पोका संतोष बेलुरोड सायबर विभागाचे अधिकारी व अंमलदार यांनी केली.
दुसऱ्या घटनेमध्ये एक इसम भगतसिंघ रोडवर कमरेला पिस्टल लाऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्याने नमुद पोलीस अधिकारी व अमलदार यांनी छापा मारुन त्यास पकडले. त्यांचे नाव प्रेमसिंघ उर्फ प्रेम पिता घरमसिंघ रामगडीया, (वय 20 वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार अबचलनगर समोर नांदेड) असे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्यांचे ताब्यात एक गावठी स्टेनलेस स्टीलची बनावट पिस्टल मिळुन आल्याने ती जप्त केली.
सदर प्रकरणी पोना गजानन किडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वजिराबाद नांदेड येथे गु.र.न. 109/2022 कलम 3/25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास मंठाळे, सपोनि पो. ठाणे वजीराबाद, नांदेड हे करीत आहेत. तसेच सदर आरोपीकडुन पोलीस ठाणे लिंबगाव गु.र.न. 53/2022 कलम 379 भारतीय दंड संहिता या गुन्हयातील चोरीस गेलेली मोटरसायकल मिळुन आली असुन ती पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
Some truly wonderful content on this site, thank you for contribution. “The difference between fiction and reality Fiction has to make sense.” by Tom Clancy.