ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ हल्लेखोरांनी घातल्या तब्बल पाच गोळ्या, चालकावरही दोन राऊंड फायरिंग
सीसीटीव्हीत कैद झालेला हत्येचा व्हिडीओ
नांदेड– प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी 9.30 वाजता पालकमंत्री अशोक चव्हाण हे विशेष विमानाने नांदेडमध्ये येत आहेत. संजय बियाणी यांच्यावर उद्या बुधवारी सकाळी 10 वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बियाणी कुटुंबियांच्या सांत्वनासाठी पालकमंत्री चव्हाण हे विशेष विमानाने तातडीने नांदेडमध्ये येत असून ते या हत्येचा प्रकाराचा आढावा घेण्याचीही शक्यता आहे. पालकमंत्री चव्हाण हे सकाळी ९.४५ वाजता हैद्राबाद येथून विशेष विमानाने नांदेडला येत असून याच विमानाने ते दुपारी ४.३० वाजता हैद्राबादकडे रवाना होणार आहेत.
संबंधित बातमी १ :
दरम्यान, येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा घटनेने येथे एकच खळबळ उडालेली आहे. पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरांनी बियाणी यांच्यावर पाच तर त्यांच्या चालकावर दोन गोळ्या घातल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. दरम्यान त्यांच्यावर आज मंगळवार दि. पाच मार्च रोजी सकाळी बियाणी यांच्या शारदा नगर येथील निवासस्थानाबाहेर दोन अनोळखी हल्लेखोरांनी पिस्तूलमधुन बेछुट गोळीबार करून त्यांची हत्या केली. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे शहरात पसरताच आनंदनगर भागात बाजारपेठ बंद करण्यात आली. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
संबंधित बातमी २ :
नांदेड शहरातील शारदानगर परिसरातील गितानगर येथील घरासमोर येताच दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार केला. बियाणी हे मंगळवारी सकाळी एका ठिकाणी जाऊन परत अकराच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनातून घरी आले. वाहनातून खाली उतरून घरात प्रवेश करत असतानाच त्यांच्यावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी जवळून गोळीबार केला. यात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. दिवसाढवळ्या नांदेडमध्ये घडलेल्या या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. बियाणी यांच्यावरील गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बियाणींच्या हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना खंडणीसाठी धमक्या देण्यात आल्या होती. त्यानंतर त्यांना देण्याचे आलेले पोलीस संरक्षण काही दिवसांपूर्वीच काढून घेण्यात आले होते.
या गोळीबारात जखमी झालेल्या बियाणी यांच्या चालकावर नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. संजय बियाणी हे नांदेडमधील प्रसिद्ध व्यावसायिक होते. खंडणीच्या वसुलीसाठी हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी हा गोळीबार कुणी व का केला याचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे नांदेड शहरात प्रामुख्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून यात बियाणी यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे दिसून येत आहे तर त्यांच्या चालकावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नांदेडमध्ये गावठी पिस्तुलांचा वापर वाढल्याचं चित्र सध्या दिसत आहे. गोळीबाराच्या घटना सर्रास घडत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संजय बियाणी यांच्यावर गोळीबार झाल्याचे वृत्तानंतर नांदेड परिक्षेत्रचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, डॉ. सिद्धेश्वर भोरे, विमानतळचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे, भाग्यनगर पोलीस ठाण्याचे सुधाकर आडे, शिवाजीनगरचे डॉक्टर नितीन काशीकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहरात नाकाबंदी लावण्याचे आदेश दिले असून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध पथक शहर व जिल्ह्याबाहेर रवाना केले आहेत.
संजय बियाणी यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ नवीन मोंढा येथील बाजारपेठ बुधवारी दिनांक सहा एप्रिल रोजी बंद ठेवण्यात येईल असे व्यापारी असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले. मारवाडी समाजातील गरजू नागरिकांना त्यांनी जुना कौठा परिसरात “महेश” आवास योजनेअंतर्गत ७३ घरं बांधून दिले आहेत. हा कार्यक्रम नुकताच पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला होता. यापूर्वीही त्यांनी कोरोनाच्या काळात जवळपास दोन हजार धान्याचे कीट गोरगरिबांना वाटप करून तब्बल एक महिना अन्नदान केले होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
great publish, very informative. I ponder why the other specialists of this sector do not notice this. You must proceed your writing. I’m confident, you have a huge readers’ base already!