ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करणात आली. ही हत्या करताना वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कुंटूर शिवारात जाळून टाकण्यात आली. काही दिवसांपूर्वी जळालेली ही पल्सर कंपनीची दुचाकी कुंटूर शिवारात आढळून आली होती, ती हीच दुचाकी आल्याचे आता निष्पन्न झाले असल्याची माहिती एसआयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि निलेश मोरे यांनी दिली.
दरम्यान, आरोपींची पोलीस कोठडी उद्या शुक्रवार दिनांक 10 जून रोजी संपणार आहे. पुढील पोलीस कोठडीसाठी तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे अटक केलेल्या नऊ आरोपींना उद्या शुक्रवार दि. 10 जून रोजी न्यायालयासमोर हजर करणार आहेत. येत्या काही दिवसात या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असून याला एसआयटीचे प्रमुख तथा अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि निलेश मोरे यांनी दुजोरा दिला.
शहराच्या शारदानगर येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्या घरासमोर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. तब्बल 55 दिवस तपास केल्यानंतर पोलिसांना या हत्येचा उलगडा करता आला. सहा राज्यात तपास तसेच तीन देशात पत्रव्यवहार करून या तपासाची कडी जोडण्यात आली. सर्वप्रथम सहा आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर तीन आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत पाठवले.
या एकूण नऊ आरोपींची पोलीस कोठडी उद्या शुक्रवार दिनांक 10 जून रोजी संपणार आहे. हल्लेखोरांनी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर ही दुचाकी कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आता आरोपींच्या पोलीस कोठडीतील तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी जळालेल्या अवस्थेत आढळलेली ती दुचाकी हीच असल्याचे आता तपासात निष्पन्न झाले आहे. आणखी काही आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.
खंडणी आणि दहशत याच कारणावरून बिल्डर संजय बियाणी यांची कुख्यात रिंदा संधू सांगण्यावरूनच त्याच्या सहकार्यांकडून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अजून काही धागेदोरे हाती येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
अटकेत असलेल्या आरोपींची पोलीस कोठडी उद्या शुक्रवार दिनांक 10 जून रोजी संपणार आहे. पुढील पोलीस कोठडीसाठी तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक संतोष तांबे हे अटक केलेल्या नऊ आरोपींना उद्या शुक्रवार दि. 10 जून रोजी न्यायालयासमोर हजर करणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणखी काही जणांना अटक केली जाणार असल्याचे समजते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻