Thursday, September 19, 2024

भाजपाचा मोठा गट काँग्रेस प्रवेशाच्या तयारीत ! एका माजी खासदारांसह दोन माजी आमदार करणार काँग्रेस प्रवेश !

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

•येत्या आठवड्यात मुंबईत होणार प्रवेश सोहळा

•नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रा. रविंद्र चव्हाण; काँग्रेस बैठकीत ठराव

नांदेड – नांदेड जिल्ह्यात भाजपला खिंडार पडणार आहे. भाजपचा एक मोठा गट काँग्रेस प्रवेश करण्याच्या तयारीत असून यात नांदेड जिल्ह्यातील एक माजी खासदार आणि दोन माजी आमदारांचा समावेश आहे. येत्या आठवड्यात मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपमध्ये राजकीय नेत्यांचे प्रवेश करण्याचे सत्र सुरू झाले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा बदलाचे एक वारे वाहू लागले आहे. यात नांदेड जिल्ह्यातही भाजपाचा एक मोठा गट काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही काळापासून हा गट भाजपामध्ये अस्वस्थ असल्याचे बोलले जात होते. यातच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. या बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार येत्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकही लागणार हे स्पष्ट आहे. ह्या लोकसभा पोटनिवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित मांडून भाजपमधील हा गट काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायकरित्या सांगण्यात येते.

एक माजी खासदार, दोन माजी आमदार !
भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असलेल्या या गटात एक माजी खासदार आणि दोन माजी आमदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा पोटनिवडणूक आणि एकूणच नांदेड जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारीचे गणित मांडून, हा गट आणि त्यातील नेते हे काँग्रेसवासी होणार आहेत.

शक्तिप्रदर्शन करत प्रवेश !
एक माजी खासदार आणि दोन माजी आमदारांसह हा गट मोठे शक्ती प्रदर्शन करीत काँग्रेस प्रवेश करणार आहे. येत्या आठवड्यात मुंबईत प्रमुख काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते.

• पोटनिवडणुकीसाठी प्रा. रविंद्र चव्हाण, काँग्रेस बैठकीत ठराव

स्व. खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसोबतच होण्याची शक्यता आहे. दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दि.९ रोजी जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे विशेष बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत लोकसभा पोटनिवडणूकीसाठी काँग्रेस कडून स्व. खा. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी ह्या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.

प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला. यावेळी दिलीप पाटील बेटमोगरेकर, श्याम दरक, अनिल मोरे, जे. पी. पाटील, डॉ. रेखाताई चव्हाण, बाळासाहेब रावणगावकर, महेश देशमुख, अब्दुल गफार, अजिज कुरेशी, सुभाष किन्हाळकर, गंगाप्रसाद काकडे, बालाजी गाडे, सुभाष रायबोळे, गंगाधर सोनकांबळे, प्रफुल्ल सावंत, पप्पू पाटील कोंडेकर, प्रल्हाद पाटील, माधव पवळे, मनोहर पाटील शिंदे, शंकर शिंदे, संजय शेळगावकर, मुन्ना अब्बास, विलास पावडे, विकास कदम, विठ्ठल पावडे, सतिश देशमुख, निरंजन पावडे, सुरेश हटकर, सत्यपाल सांवत, बापूसाहेब पाटील, मुन्तजिंब, सुभाष लोणे, शरद पवार, सुनील वानखेडे, पप्पू बेग, प्रताप देशमुख, इंजि. नसिम पठाण, गणेश वजिरगावकर, आत्माराम वानोळे पाटील, धनंजय उमरीकर, अनिल कांबळे, जेशिका शिंदे, संतोष बारसे, रंगराव भुजबळ, आनंदसिंह ठाकूर, कुलदिप ठाकूर, सुनील कांबळे, गोविंद पाटील, प्रथमेश गिरी, आदीसह काँग्रेस पदाधिकारी- कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!