ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ धर्माबादेत ‘बुलढाणा अर्बन’ला भेट देणार
◆ नांदेड शहरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन
नांदेड– भारतीय जनता पार्टीचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या हे उद्या गुरुवार, दि. ६ जानेवारी रोजी नादेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी देवगिरी एक्स्प्रेसने धर्माबाद येथे त्यांचे आगमन होईल. भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष रविन्द्रअण्णा पोतगंटीवार यांच्याकडे सदिच्छा भेट देऊन ते बुलढाणा अर्बन को. ऑप. च्या शाखेला भेट देणार आहेत. त्यानंतर ते नांदेडला येणार असून महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते दीपकसिंह रावत यांचा दालनास भेट देऊन मनपा संबधित विषयांची माहिती घेणार आहेत.
महापालिकेस भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या भाजप आ. राजेश पवार यांच्याकडे सदिच्छा भेट देऊन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांचा आयटीआय येथील कार्यालयात पदाधिकाऱ्यांसह अनेकांची भेट घेणार आहेत. दुपारी ४ वाजता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालय येथे पत्रकार परिषदेस संबोधित करणार आहेत. सायंकाळी ५ वाजता भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह मंडल अध्यक्ष मोर्चाचे अध्यक्ष, शक्ती केंद्रप्रमुख, बुथ प्रमुख यांची बैठक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालय येथे ठेवण्यात आली आहे.
सायंकाळी वजिराबाद, हनुमान पेठ येथील उत्सव बॅक्वेट हाॅल येथे लोहाना गुजराथी समाज बांधवांकडुन त्याचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांचा निवासस्थानी सदिच्छा भेट देणार असून रात्री मुंबईकडे प्रयाण करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻