ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
लातूर- भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे मार्गदर्शक तथा पालक पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे यांची ८३ व्या वाढदिवसानिमित्त ग्रामगीता या ग्रंथाने तुला करण्यात आली.
सु.श्री.रामप्रियाश्रीजी यांच्या विशेष उपस्थितीत डॉ.ज्योत्स्नाताई कुकडे, सौ.वर्षाताई शेटे, श्रीमती आलिशा अग्रवाल, श्रीमती.मनिषा टोपरे, सौ.इंदू ठाकूर, सौ.शैलजा कुलकर्णी, सौ.तेजस्विनी सांजेकर या सात सुवासिनींनी त्यांचे औक्षण केले. यानंतर ग्रामगीता या ग्रंथाने मंगल मंत्रोच्चाराने ग्रंथतुला करून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
यावेळी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह जितेश चापसी, स्थानिक समन्वयक समितीचे अध्यक्ष आनंदराज तावशीकर, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष मनोज शिरुरे, सीबीएस ईस्कूलचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी, विद्यासभा अध्यक्ष किरणराव भावठाणकर, विद्यासभा सहसंयोजक महेश कस्तुरे, मुख्याध्यापक सुनील वसमतकर, मुख्याध्यापक शिवाजीराव हेंडगे (प्राथमिक विद्यालय), मुख्याध्यापक उमेश सेलूकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक केशवराज विद्यालय लातूर),बाळासाहेब केंद्रे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक संजय कुलकर्णी, संदीप देशमुख, प्रदीप राऊत (उपाध्यक्ष, माजी विद्यार्थी संघ), गुरुनाथ झुंजारे (माजी विद्यार्थी समन्वयक), उमेश गाडे (केंद्रप्रमुख आस्था संकुल), राहुल गायकवाड (जनसंपर्क अधिकारी) भूषण भावे तथा सर्व अधिकारी,पदाधिकारी, परिसरातील नागरिक, शिक्षक या सर्वांनी अभिष्टचिंतन करुन काकांना शुभेच्छा दिल्या. लातूरकरांच्या प्रेमाविषयी भावूक होऊन काकांनी यावेळी सद्गदित भावना व्यक्त केल्या.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻