ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहरातील चिरागगल्ली भागात राहणाऱ्या सख्ख्या भावाचा खून भावाकडून करण्यात आला निमित्त होते फक्त दारू पिण्यास पैसे का दिले नसल्याचे! मारेकरी भावास पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना दि. 23 फेब्रुवारी रोजी घडली.
चिरागगल्ली मध्ये राहणाऱ्या गंगाबाई बालाजीसिंह ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 23 फेब्रुवारीच्या दुपारी त्यांचा मोठा मुलगा जुगनूसिंह ठाकूर याने त्याचा लहान भाऊ अरुणसिंह बालाजीसिंह ठाकूर याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. पण छोटा भाऊ अरुणसिंहने पैसे दिले नाही, तेंव्हा जुगनूसिंहने त्याला लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला.
इतवारा पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक आर. एस. मुत्त्येपोड यांच्याकडे देण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक आर. एस. मुत्येपोड आणि त्यांच्या सहकारी अंमलदारांनी जुगनूसिंह बालाजीसिंह ठाकूर (वय 35) यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी जुगनूसिंहला पोलीस कोठडीत पाठविले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻