ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांना गड- किल्ल्यांची नाव देणे गैर नाही. परंतु त्या नावाला साजेसे काम त्या बंगल्यातून व्हावे, गड किल्ल्याच्या नावांचे पावित्र्य जपले जावे, अशी अपेक्षा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेड येथे बोलताना व्यक्त केली.
छत्रपती संभाजीराजे भोसले नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते. शुक्रवारी रात्री शहराच्या छत्रपती चौक भागात एका जिमच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, काँग्रेसचे विठ्ठल पावडे, आशाताई शिंदे, माधव पाटील देवसरकर, सुनील पाटील वडवणकर, अनिल भालेराव, सुनील भालेराव आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्र्यांच्या बंगल्यांना गड- किल्ल्याचे नाव देण्यात आपल्याविषयी आपली भावना व्यक्त केली. महाविकासआघाडी सरकारने राज्यातील मंत्र्यांच्या बंगल्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने मंत्र्यांच्या बंगल्यांना किल्ल्याची नावे देण्याचा निर्णय झाल्याचे सरकारने म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर मंत्र्यांच्या शासकिय निवासस्थानांचे नामांतर करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यानुसार मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांचे नामांतर करण्यात आले आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे यांच्या शासकीय बंगल्याला रायगड असे नाव देण्यात आले आहे. तर अमित देशमुख यांचा बंगला आता जंजिरा या नावाने ओळखला जाणार आहे.
मंत्री आणि त्यांच्या बंगल्याला देण्यात आलेली किल्ल्याची नावं-
आदित्य ठाकरे- रायगड
अमित देशमुख- जंजिरा
जितेंद्र आव्हाड- शिवगड
विजय वडेट्टीवार- सिंहगड
वर्षा गायकवाड- पावनगड
उदय सामंत – रत्नसिंधू
केसी पाडवी- प्रतापगड
हसन मुश्रीफ- विजयदुर्ग
दादा भुसे- राजगड
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻