Friday, November 22, 2024

मटनातून २७ जणांना विषबाधा; लाईट गेल्याने फ्रिजमधील मटनातून विषबाधा; माहूर तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेडअवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे लाईट गेल्याने फ्रिज बंद झाले. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेल्या कंदुरीच्या मटनात विषबाधा झाल्याची घटना माहूर तालुक्यात घडली आहे.

माहूर तालुक्यातील वानोळातांडा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात मटण खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली. बुधवार दि. तीन मे रोजी २७ जणांना ही बाधा झाली असून गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली.

वानोळातांडा येथे ३ मे रोजी कंदुरीचा कार्यक्रम होता. मटण फ्रिजमध्ये आणून ठेवले होते. रात्रीला विजेची समस्या कायम असल्याने फ्रीज बंद पडले होते. हे मटण खाल्ल्याने दत्ताराम राठोड (वय ४०), बळीराम राठोड (वय ६५), नितीन राठोड (वय ३०), विलास
पवार (वय ४७), संगीता राठोड (वय ३४), नम्रता राठोड (वय २६), सृष्टी पवार (वय ११), हरीश राठोड (वय १०), क्रिश राठोड (वय ५), त्रिशा राठोड (वय ३), अनिल राठोड (वय ४५), संतोष चव्हाण (वय ४५), सोनू राठोड (वय २५), क्रांती राठोड (वय २०), ललिता राठोड (वय ३०), प्रांजल राठोड (वय ४), विजय राठोड (वय ४०), कोमल राठोड (वय ६०), रामराव राठोड (वय ३५), शिवपाल राठोड (वय ३६), नमिबाई जाधव (वय ६०), भारती पवार (वय १८), रंजना राठोड (वय ३५), चंद्रकला राठोड (वय ३०), जागेश्वर आडे (वय ५२), अर्जुन चव्हाण (वय ५०), प्रेमीलाबाई आडे (वय ४५) सर्व रा. वानोळातांडा अशा २७ जणांना विषबाधा झाली आहे. या सर्वांना बुधवारी दुपारी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

फ्रीज बंद पडले अन् पदार्थ झाले विषबाधित
कंदुरीच्या कार्यक्रमासाठी आदल्या दिवशी रात्रीच पदार्थ आणून फ्रीजमध्ये ठेवले होते. मात्र रात्रभर गावात विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे परिसरातील लाईट बंद होती. त्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ निकामी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. त्यामुळे फ्रीज बंद पडले. परिणामी विषबाधेचा हा प्रकार झाला.

मागील दहा दिवसापासून जिल्हाभरात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान मांडले आहे. यामुळे काही भागात लाईटचे खांब तुटून पडलेत व विद्युत पुरवठाही बंद झाला. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा महावितरणच्या वतीने बंद करण्यात येतोय. कुठलाही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यातूनच हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. प्रत्यक्ष वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेच पण वादळी वाऱ्याचा असाही फटका बसताना दिसत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!