ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड)- आगामी काळात होणाऱ्या निवडणुका शिवसेना (ठाकरे गट) स्वबळावर लढविणार असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी येथे एका कार्यक्रमात दिली. नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हे जाहीर केले. तसेच शिवसैनिकांना साम दाम देऊन मदत करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिली.
नांदेड जिल्हा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांच्या फार्म हाऊस येथे दि.८ रविवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेना संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, महानगरप्रमुख पप्पू जाधव, बंडू खेडकर, नेताजी भोसले, विजय मुंडकर, नरहरी वाघ, उपजिल्हाप्रमुख बाळू पाटील कऱ्हाळे, बाळासाहेब देशमुख, बालाजी बंडे, बालाजी पवार, महेश खेडकर आदी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा आढावा बैठकीत बोलताना शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे. राज्यातील सरकार सूडबुद्धीने शिवसेना नेते, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना टार्गेट करून ईडी आदी ससेमीरा मागे लावत भीती दाखवत आहे. शिवसेना ईडीला न घाबरता सीडी लावल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तसेच आगामी काळात शिवसेना वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात बैठका घेणार असून त्या त्या ठिकाणी मुक्कामी राहून त्या तालुक्यातील शिवसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या आढावा बैठकीत संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी दिले.
यावेळी बोलताना माजी आ. रोहिदास चव्हाण म्हणाले की, भाजपाने गुजरातमध्ये सत्ता आणण्यासाठी महाराष्ट्रातील उद्योग पळविले, कर्नाटक प्रकरणी सरकार चिडी चूप का? ४० आमदारांचे अस्तित्व संपणार आहे. आपण सर्वांनी एकत्र राहून पक्ष वाढवावा असे आवाहन चव्हाण यांनी केले. माजी आमदार नागेश पाटील बोलतांना म्हणाले की, जनता महागाईत होरपळून जात आहेत. विद्युत कंपनीचे खाजगीकरण करून जनतेला वेठीस धरण्याचे काम राज्यसरकार करीत आहे. शिवसेना हा डाव हाणून पाडील आणि कदापिही खाजगीकरण होऊ देणार नाही. राजकीय परिस्थितीशी दोन हात करून एकच झेंडा, भगवा झेंडा म्हणून शिवसेना वाढविण्यासाठी तसेच निवडणूका जिंकण्यासाठी मेहनत करा यश निश्चित मिळते, कामाला लागा असे आवाहन आष्टीकर यांनी केले आहे.
यावेळी उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख, बालाजी पवार, उपसभापती अशोक कपाटे, तालुका प्रमुख संतोष कल्याणकर, अशोक मोरे, व्यंकोबा येडे, विश्वांभर पवार, पिंटू पाटील, माधवराव वडगावकर, महेश पाटील, अविनाश झमकडे, पांडुरंग वर्षेवार,
अंकुश मामीडवार, सचिन इंगोले, सचिन चंद्रे, रमेश क्षीरसागर, सदाशिव इंगळे, अशोक डांगे, ऍड. परमेश्वर पांचाळ, काजी सल्लावोद्दीन, शिवप्रसाद दाळपुसे, शेख रफिक, नागेश सरोळे, सुनिल बोबडे,संभाजी देशमुख,चेतन कल्याणकर,उपसरपंच अरविंद पांचाळ,अमोल बारसे, एकनाथ मोगरकर, ओमप्रकाश नागलमे, महेश बुटले, दत्ता भरकड, नागोराव ढगे आदींसह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
या बैठकीत जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, महेश पाटील यांचीही भाषणे झाली. बैठकीचे प्रास्ताविक प्रकाश मारावार यांनी केले. सुत्रसंचालन बालाजी गोदरे यांनी तर आभार जिल्हाप्रमुख बबनराव बारसे यांनी मानले.
महाविकास आघाडी आगामी सर्व निवडणुका एकत्र लढणार असाच सर्वांचा कयास होता. मात्र एकुणच बबनराव थोरात यांनी दिलेल्या या माहितीवरून महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻