ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भोकर, हदगाव आणि किनवट विधानसभेची धुरा
नांदेड: हदगाव- हिमायतनगरचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांची शिवसेनेच्या नांदेड जिल्हाप्रमुखपदी वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे हदगाव- हिमायतनगर, किनवट- माहूर आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील खासदार हेमंत पाटील आणि आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही निवड केल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील खासदार हेमंत पाटील आणि कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या दोघांना शह देण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी तीन जिल्हाप्रमुखांची निवड केली आहे. त्यात हदगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या खांद्यावर आता भोकर, हदगाव आणि किनवट विधानसभेची जबाबदारी सोपवत त्यांची शिवसेनेच्या नंददड जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
आष्टीकर यांच्याकडे देण्यात आलेल्या जबाबदारीपैकी हदगाव आणि किनवट या दोन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे तर भोकर विधानसभा ही शिंदे गटात गेलेले बंडखोर जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर यांच्याकडे होती.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे आणि नांदेड- हिंगोलीचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मातोश्रीवर नांदेड- माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर आणि हिंगोली- विनायक भिसे, संदेश देशमुख या तिघांची जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. त्यात हिंगोली आणि सेनगाव संदेश देशमुख यांच्याकडे तर कळमनुरी विधानसभा विनायक भिसे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने हिंगोली आणि नांदेड जिह्यांतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ती यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली.
◆ सहसंपर्कप्रमुख (हिंगोली जिल्हा) – अजय (गोपू) पाटील, जिल्हाप्रमुख (हिंगोली, कळमनुरी) – विनायक भिसे, जिल्हाप्रमुख (वसमत, सेनगाव) – संदेश देशमुख, जिल्हा संघटक (हिंगोली) – बाळासाहेब मगर, सहसंपर्क संघटक (हिंगोली जिल्हा) – अॅड. रवी शिंदे.
◆नांदेड जिल्हाप्रमुख (हदगाव, किनवट, भोकर) – नागेश पाटील आष्टीकर.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻