ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– एकाच्या मानेवर तलवारीने जबर वार करून त्यास लुटण्यात आल्याची थरारक घटना नांदेडमध्ये घडली आहे. शहरातील जुना कौठा भागात ही घटना घडली असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.
कौठा भागातील एकाला तलवारीने घाव घालून गंभीर जखमी करण्यात आले. सोन्याची चेन, रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज यात चोरट्यांनी लुटला आहे.
चोरट्यांनी कौठा पुलाजवळील सखाराम काळे यांच्या आखाड्यावर रविवार दि. १५ मे रोजी सायंकाळी हल्ला करून ही जबरी चोरी केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोलीस फौजदार महेश कोरे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमीला नांदेडच्या विष्णुपुरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻